काही दिवसांपूर्वी हिमाचल प्रदेशातील मंडी जिल्ह्यातील सियाठी गावात भूस्खलन झाले होते. यामुळे संपूर्ण गाव मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडले गेले आहे. मात्र या घटनेत एका श्वानामुळे तब्बल 67 लोकांचा जीव वाचला आहे. या दुर्घटनेपूर्वी एका श्वानाने दिलेल्या इशाऱ्यामुळे लोकांचा जीव वाचला आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
जूनच्या रात्री सियाठी गावात मुसळधार पाऊस पडत होता. गावातील लोक आरामात झोपले होते. मात्र त्या रात्री एका घरातील दुसऱ्या मजल्यावर असलेला एक श्वान अचानक जोरजोरात भुंकू लागला, यामुळे कुंटूंबीयांना जाग आली. लोक सुरुवातीला घाबरले, मात्र त्यांना घराच्या भिंतीला तडे गेल्याचे दिसले. यामुळे घरात पाणी भरायला सुरुवात झाली होती.

