संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आगामी ७५ व्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या निवृत्तीबाबत भाष्य केले आहे. मोहन भागवत यांच्या विधानाचा उल्लेख करत राऊत यांनी मोदींची निवृत्ती देशासाठी शुभसंकेत असल्याचे म्हटले आहे
पंतप्रधान नरेंद्र मोदी यंदा ७५ वर्षांचे होत आहेत. त्यामुळे ते निवृत्ती घेणार का याकडे सर्वांचेच लक्ष लागलं आहे. त्यातच सरसंघचालक मोहन भागवत यांनी पंच्याहत्तरीची शाल जेव्हा अंगावर पडते, तेव्हा याचा अर्थ थांबायचा असतो, असे विधान एका कार्यक्रमात केले होते. त्यावर आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी निवृत्त होतात हे देशासाठी शुभसंकेत आहेत, असा खोचक टोला संजय राऊतांनी लगावला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी निवृत्त होणं हे देशासाठी शुभसंकेत, संजय राऊतांचा खोचक टोला

